उस्मानाबाद/प्रतिनिधी-

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत दि. 26 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर 2022 हा कालावधी सामाजिक न्यायपर्व म्हणून करण्यात येत आहे. विभागाचे सचिव, आयुक्त आणि प्रादेशिक उपायुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार समतापर्व निमित्त विविध कार्यक्रमाचे आणि उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 त्यानुसार आज दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संविधान रॅलीत जिल्हा परिषद कन्या प्रशाला ‍उस्मानाबाद येथे शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थी उपस्थिती होते.     सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षि शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प्‍हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले तसेच सर्व उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर यांनी सामूहिक संविधान उद्देशिकेचे  वाचन करण्यात आले. 

  यावेळी उपस्थित मान्यवर सामाजिक कार्यकर्ते धंनजय शिंगाडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत, जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी रामलिंग काळे, विस्तार अधिकारी (शिक्षण) जंगम साहेब, कक्ष अधिकारी पी.वाय.जाधव, विज्ञान पर्यवेक्षक काझी सर, श्री.रणजित हाजगुडे, कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हाके मॅडम आणि उस्मानाबाद शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांच्या उपस्थितीत संविधान रॅलीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये आश्रमशाळा यमगरवाडी येथील विद्याथी झांज पथकासह रॅलीमध्ये सहभागी झाले होते. तसेच शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील एक हजार सातशे विद्यार्थी आणि नागरिक मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. तसेच विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा धारण करुन, संविधान दिनाच्या अनुषंगाने घोषवाक्याचे फलक घेऊन संविधान रॅलीची शोभा वाढविली. ही रॅली जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथून निघाल्यानंतर विद्यार्थ्यांनी घोषणा देत संविधान रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. ही रॅली पुढे मार्गक्रमण करित छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोहचल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तदनंतर या रॅलीने जिल्हा परिषद कडे प्रस्थान केले. या रॅलीचे जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना समाजिक न्याय विभागाच्यावतीने खाऊ आणि पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले. तदनंतर राष्ट्रगीताचे  गायन करुन संविधान रॅलीचा समारोप  करण्यात आला.

 
Top