उस्मानाबाद/प्रतिनिधी-

 आरोग्य विभाग आणी आर के एच आय व्ही एडस् रिसर्च अ‍ॅण्ड केअरिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन परांडा येथे होत आहे,हे महाआरोग्य शिबिर म्हणजे न भुतो न भविष्यती असे असून नुसतीच तपासणीस नाही तर मोफत उपचार देखील असलेले हे महाआरोग्य शिबिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले. 

उस्मानाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सर्वाधिक महाआरोग्य शिबीर घेतल्याची नोंद असलेले डाॅ. धर्मेंद्र कुमार यांची उपस्थिती होती. 

  यावेळी बोलताना डाॅ.गलांडे म्हणाले की उस्मानाबाद जिल्हा हा आकंक्षित जिल्ह्यात मोडत असून डोंगराळ भाग तसेच मागासलेला भाग असलेल्या कारणाने परांडा येथे हे भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या आधि आपण परांडा,भूम,वाशी, कळंब, या तालुक्यात बेसलाईन सर्वे केला. या सर्वेक्षणातून जवळपास 65 हजार रूग्णांची नोंद झाली, या बरोबरच सोलापूर जिल्ह्य़ातील बार्शी,पंढरपूर, माढा या तालुक्यातील नागरिक हे थेट तपासणीस येणार आहेत. आरोग्य विभागाचे अठराशे पेक्षा जास्त डाॅक्टर्ससह इतर कर्मचारी हे रूग्णांची तपासणी करणार आहेत. याचे नियोजन देखील त्याप्रमाणेच केले आहे. तपासणी करून रूग्ण हे औषधी घेऊन थेट बाहेर पडतील, ज्या रूग्णांच्या वैदयकिय चाचण्या करावयाच्या आहेत ते त्या करतील ,यात काही आढळून आले तर स्पेशलिस्ट डाॅक्टर हे त्यांच्यावर  पुढिल उपचार करतील. असे नियोजन या शिबिराचे केले असून राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत हे या शिबीराचे उद्धाटन करणार आहेत. 

    देशातील आणी परदेशातील जवळपास साडे सहाशे तज्ञ डॉक्टर्स हे या महाआरोग्य शिबिरात उपस्थित राहून रूग्णांची तपासणी, पुढील उपचार करणार असल्याचे डाॅ.धर्मेंद्र कुमार यांनी सांगून रूग्णांचा वाढता प्रतिसाद पाहता हे दोन दिवसीय शिबिर ठेवण्यात आले. या शिबिरात दिव्यांगाने व्हिलचेयर,चष्मे, महागडी औषधे, तसेच इतर वैदयकिय साहित्य मोफत देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. 

निवास,भोजन, वाहतूक औषधोपचार या सर्व बाबीचे उत्तम नियोजन केले असून ग्रामीण भागातील रूग्णांना त्यांच्या घरापासून घरापर्यंतची सोय आरोग्यमंत्री सावंत यांनी केली असल्याचे धर्मेंद्र कुमार यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. 

महाआरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन याप्रसंगी केले.

 
Top