उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शहरातील समतानगर येथील रहिवासी भिकाजी आबाराव सावंत (वय 85) यांचे शनिवार, 26 नोव्हेंबर रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते सेवानिवृत्त जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशोक सावंत यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातू, असा परिवार आहे.