वाशी / प्रतिनिधी-

 कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथील मुलींचे वसतिगृह येथे सोलार वॉटर हिटर देण्याचे मंत्री तानाजी सावंत यांनी आश्वासन दिले होते त्याचा  लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री  प्रा.डॉ तानाजीराव सावंत  यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. 

यावेळी  जयकुमार शितोळ, दिलीप रेवडकर , प्रशांत बाबा चेडे,  दत्ता  साळुंके,  सुरज साळुंके, धनंजय सावंत, नागनाथ बापू नाईकवाडी,  सत्यवान गपाट ,शिवहार स्वामी ,  बाळासाहेब  मांगले ,  विकास तळेकर ,  अतुल चौधरी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रविंद्र कठारे  यांची प्रमुख उपस्थिती होती. 

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. प्रा.डॉ तानाजीराव सावंत साहेब यांनी मुलींचे वसतिगृहाला प्रत्येकी 500 लीटरचे १८ सोलार वॉटर हिटर स्वखर्चातून दिले त्याचा   लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी मुलींशी शैक्षणिक व सुविधाबाबत  चर्चा केली व मुलींच्या वसतिगृहामध्ये मुलींसाठी टीव्ही व 5 काॕम्युटर देण्याचे जाहीर केले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.दैवशाला रसाळ, प्रा.सुनिता डोके, प्रा. छाया नखाते, प्रा. अनिता चिंचोलकर, प्रा. डाॕ. चेतना जगताप, प्रा. सारीका गादेकर, प्रा. शालन जगताप  यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रा.जयंत कवडे, प्रा.राम जाधव, प्रा.शाम डोके, प्रा.महादेव उंदरे, प्रा.शहाजी चेडे, प्रा. पांडुरंग तांबारे,  शिवाजी साळुंके तसेच महाविद्यालयातील  प्राध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top