उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस, आ. राणादादा पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.व्यंकटराव गुंड  यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाडोळी गावातील विविध पक्षातील शेकडो युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे पाडोळी गटासह धाराशीव तालुक्यात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे. 

  राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अजित पवार, दादा शिराळ, किरण गुंड, अनंत पवार, धनंजय पवार, अतुल जाधव, किरण खराडे, आप्पा काळे यांच्यासह शेकडो समर्थकांनी धाराशीव येथील प्रतिष्ठान भवन येथे भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश घेतला. प्रवेश घेतलेल्या सर्वाचे पक्षात स्वागत करून सत्कार करण्यात आला.

 यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, पाडोळी सोसायटीचे चेअरमन रावसाहेब गुंड, माजी चेअरमन भरत गुंड, चेअरमन मनोज गुंड, सोसायटी संचालक सहदेव ढाकरे, नाना अंबुरे, बाळासाहेब पवार, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत चव्हाण, ॲड शरद गुंड, संदीप अण्णा गुंड, भगवंत गुंड, नागनाथ जंगाले,  विकास सोनटक्के, शाहू  खराडे, बालाजी खराडे, भारत बोचरे यांच्यासह पाडोळी गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top