लोहारा/प्रतिनिधी

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन बाळासाहेब शिवसेना लोहारा तालुका यांच्यावतीने शहरातील संपर्क कार्यालयात दि.17 नोव्हेंबर 2022 रोजी साजरा करण्यात आला.यावेळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

बाळासाहेब शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, नगराध्यक्ष वैशाली खराडे, शिवसेना नेते अभिमान खराडे, शिवसेना गटनेते सारिका बंगले, महिला बालकल्याण सभापती शमाबी शेख,नगरसेवक अमिन सुंबेकर,नगरसेवक अविनाश माळी,नगरसेवक जालिंदर कोकणे,पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे,रोहयो माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले,युवा सेना तालुका उपप्रमुख शिवराज चिनगुंडे,युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, बाळासाहेब कोरे,युवा सेना शाखा प्रमुख किरण डोंगरे, प्रभुराज खराडे, नयुमोददीन सवार,शम्मु भोंगळे,अदि उपस्थित होते.


 
Top