तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर येथील कालभैरव  मंदीरात  बुधवार दि.१६रोजी  कालभैरवनाथ जयंती  विविध धार्मिक कार्यक्रमाने  पारंपरिक पध्दतीने साजरी करण्यात आली.

 कालभैरव जयंतीनिमित्ताने  बुधवार दि. १६  रोजी सकाळी कालभैरव मुर्तीस भाविकांचे  तैल अभिषेक करण्यात आले. नंतर दुपारी १२.३० ते ०५ वा .कालावधीत  कालभैरव अष्टक व बटुकभैरव स्त्रोत्र यज्ञ विधी संपन्न झाला.  सायं . ५ वा. रांगोळी रेखाटन , दिपप्रज्वलन आणि सामुहीक महाआरती आदी कार्यक्रम संपन्न झाले . सांयकाळी  : ७५० वाती तुपातील दिपपणत्या मंदीर परिसरात लावण्यात  आल्या. कालभैरव जयंती पारंपरिक पध्दतीने साजरी करण्यासाठी  : श्री . काळभैरवनाथ  परिवार भिंडोळी उत्सव समिती , आराधवाडी ,  श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र , तुळजापूर आणि उस्मानाबाद  कलाविष्कार ग्रुप आणि सर्व तुळजापूरवासीयांनी परिश्रम घेतले. 


 
Top