उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

: त्रैलोक्याचे स्वामी प.पू. श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सनिमित्त पिताश्री श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने गुरूचरित्र पारायण, भजन, कीर्तन, अखंड हरिनाम सप्ताह, महाप्रसाद सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.उस्मानाबाद -धाराशिव शहरातील श्री सदगुरू कॉलनी, भानूनगर येथे गुरूवार, दि. १ ते ८ डिसेंबर या कालावधीत हा सप्ताह सोहळा संपन्न होणार आहे. 

उस्मानाबाद-धाराशिव शहरातील श्री सदगुरू कॉलनी येथे पिताश्री श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठाणच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सवनिमित्त अखंड दत्तनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले आहे. सप्ताहचे यंदा ८ वे वर्षे आहे. गुरूवार, दि. १ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. महंत श्री तुकोजी बाबा (तुळजापूर) यांच्या हस्ते देव-देवतांच्या पूजन विधीने सप्ताह सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. दु. १ वा. मुक्ताई मंडळाची (महात्मा गांधीनगर) भजनसेवा, शुक्रवार, दि. २ डिसेंबर रोजी माऊली मंडळ (श्री गणेश नगर) भजन सेवा, शनिवार, दि. ३ रोजी विठ्ठल- रखुमाई सुयोग मंडळ (सांजारोड), रविवार, दि.४ रोजी गणगण गणात बोते मंडळ (पोस्ट कॉलनी), सोमवार, दि.५ रोजी संत जनाबाई मंडळ (शांतीनिकेतन कॉलनी), मंगळवार, दि.६ रोजी रुक्मीणी मंडळ (बँक कॉलनी), बुधवार दि.७ रोजी शोभन मंडळ (श्री सदगुरू कॉलनी), सायं. ६ वा. सुप्रसिध्द भजनसम्राट शिवकुमार मोहेकर यांची भजनसंध्या तर गुरूवार, दि. ८ डिसेंबर रोजी श्री दत्तगुरूंच्या पादुकांचा महाभिषेक, सकाळी ८ वा. गुरूचरित्र ग्रंथदिंडी, १० वा. शांतीब्रम्ह हभप नवनाथ महाराज चिखलीकर यांची कीर्तन सेवा, दुपारी १२.३० वा. श्री दत्तगुरुंचा जन्मोत्सव सोहळा व महाप्रसाद होणार आहे. या सोहळ्याचा भाविक -भक्त, नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पिताश्री श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने धनंजय रणदिवे, प्रशांत रणदिवे , बलराज रणदिवे यांनी केले आहे.

 
Top