उमरगा / प्रतिनिधी-

सावकारांच्या जाचाला कंटाळून एका शेतकर्‍याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे 27 नोव्हेंबर रोजी घडली आहे. या प्रकरणी मयत शेतकर्‍याच्या भावाने उमरगा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 7 जणांच्या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  नारंगवाडी ता. उमरगा येथील शेतकरी दिगंबर माधव लोहार यांनी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड करूनही सावकार शेत नावावर करून देत नव्हते. सावकारांच्या जाचाला कंटाळून शेतकरी दिगंबर लोहार यांनी 27 नोव्हेंबर रोजी शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. शालीनी फत्तेपुरे, दिनकर फत्तेपुरे, दयानंद पाटील, गजानंद पाटील, गुंडेराव पाटील, किसन मुगळे, आनंद फत्तेपुरे या सर्वांनी 1 ऑगस्ट 2021 पासून दिलेल्या त्रासास कंटाळून दिगंबर माधव लोहार यांनी शेतातील झाडास गळफास घेवून आत्महत्या केली. अशी फिर्याद दत्तात्रय माधव देशमुख (लोहार) यांनी दिल्याने पोलिसांनी भा.दं.सं. कलम- 306, 504, 506, 34 अंतर्गत 7 जणांच्या विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


 
Top