उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हा हा अवर्षणप्रवण आहे. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार दरवर्षीप्रमाणे या जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील विवाहपात्र मुलांमुलींसाठी सामुदायिक विवाह सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे सुनिश्चित केले आहे. त्याकरिता या कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय येथे मंगळवार, दि.29 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी ठिक 04.00 वाजता निम्नस्वाक्षरिकार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत सामुदायिक विवाह सोहळा समितीची निवड करण्यात येणार असल्याने सर्व सेवाभावी संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी आणि त्यांचे विधिज्ञ यांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय येथे बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे अधीक्षक रा.स.दुधाळे यांनी केले आहे.