उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 संसदरत्न  खा. सुप्रिया ताई सुळे यांच्या बाबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले विधान अतिशय घृणास्पद आहे. कृषी मंत्र्यांचे हे विधान फक्त एका स्त्री लोकप्रतिनिधीचा अवमान करणारे नसून समस्त महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला गालबोट लावणारे आहे. या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस तीव्र शब्दात निषेध करत आहे.

  छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणा देऊन पुतळ्याला जोडे मारून पुतळा जाळण्यात आला.या राज्याच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या अब्दुल सत्तारांना राज्य सरकारने वेळीच आवर घालावा. तसेच अब्दुल सत्तार यांनी 24 तासाच्या आत खासदार संसदरत्न आदरणीय खा.सुप्रियाताई सुळे यांची माफी मागावी अन्यथा अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने देण्यात आला. 

   याप्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे  शहराध्यक्ष सौरभ देशमुख, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष रॉबिन बागडे, महेश सुरवसे, प्रतीक माने,  पृथ्वीराज मुळे, अनुराग गाडेकर, ,शशि पवार,  आविष्कार लोंढे,यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते, राष्ट्रवादी प्रेमी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.


 
Top