तुळजापूर/प्रतिनिधी- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे थोर स्वातंत्र्ययोध्दा जननायक बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ मणेर म्हणाले की,१५ नोव्हेंबर १८७५ मध्ये मुंडा समाजामध्ये यांचा जन्म झाला, वयाच्या २० व्या वर्षी इंग्रज सरकारने शेतकऱ्यांना जो जाचक कर लादला होता त्याचा आपल्या समाजातील तरुणांना एकत्रीत करुन प्रखरतेने विरोध केला, तत्कालीन वेळी त्यांना लोक देवता म्हणत परंतु बिरसा मुंडा यांना ही संकल्पना मान्य नव्हती, निसर्गावर , जीवसृष्टीवर प्रेम करणारे त्यांचा स्वभाव होता,त्यांनी आपल्या आयुष्यात अंधश्रद्धा कधीही मानली नाही, आजच्या तरुण पिढीने जननायक बिरसा मुंडा यांचा आदर्श घेण्याचा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला, याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ एम आर आडे यांनी केले तर आभार डॉ आर बी रोकडे यांनी मानले.

 
Top