तुळजापूर / प्रतिनिधी-

जवाहर नवोदय विद्यालय  2022 प्रवेशासाठी नगर परिषद प्रा.शाळा क्र.3 तुळजापूर (खुर्द)शाळेच्या कु. योगिता राजेश विटकर हिची  दुसऱ्या निवड यादीत  निवड झाली आहे. तुळजापूर शहरातून निवड होणारी ही एकमेव विद्यार्थीनी ठरली आहे. 

     तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत कु.ज्ञानसी सतीश साळुंके ही पात्र झाल्यामुळे दोघींचा बाल दिनाचे औचित्य साधून नगर परिषद तुळजापूरचे मुख्याधिकारी   अरविंद नातू यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.   या प्रसंगी  केंद्रप्रमुख  बापू शिंदे, मुख्याध्यापक  तुकाराम मोटे, शिक्षण विभाग लिपिक  दत्तात्रय डोंगरे ,मार्गदर्शक शिक्षक  अशोक शेंडगे,  जालिंदर राऊत, सतीश यादव, विश्वजीत निडवंचे, श्रीम. नीता गायकवाड,  निर्मला कुलकर्णी, रवीकुमार पवार आदी उपस्थितीत होते.


 
Top