तुळजापुर/ प्रतिनिधी- 

 श्री तुळजाभवानी मंदीर महाद्वारासमोर सोमवार दि. ७रोजी दुपारी  3 वाजण्याच्या सुमारास प्रशासनाने  गोपनीयरित्या रेस्क्यु आँपरेशन करुन अल्पवयीन भिक मागणाऱ्या 16 बालकांना  ताब्यात घेतले नंतर त्यांची उपजिल्हारुग्णालय येथे वैद्यकिय तपासणी करण्यात  येवुन बाल कल्याण समिती समोर हजर करण्यासाठी उस्मानाबादला रवाना करण्यात आले.

 सदरील रेस्क्यु आँपरेशन तहसीलदार सौदागर तांदळे, महिला पोलिस उपनिरक्षक मंजुळे , मंदिर  शिक्षण विभाग, यांनी यशस्वी केले. या  रेस्क्यू आँपरैशन मध्ये ,  दहा मुली आणि सहा मुलं मिळून आली त्यामध्ये 03 वर्षांपासून 13 वर्षापर्यंत च्या बालकांचा  सहभाग होता,अशी माहीती  सामाजिक कार्यकर्ते  संजय बोंदर यांनी दिली.


 
Top