तुळजापूर / प्रतिनिधी- बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गुरुवार दि २४रोजी सहकुंटुंब तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन नवसपुर्ती पोटी पंचाहत्तर तोळे सुवर्ण हार व सुवर्ण पादुका देवीचरणी अर्पण केली .
यावेळी त्यांची पत्नी पुञ सुना नातवंडे तसेच बाळासाहेबांची शिवसेना युवासेनेचे सरचिटणिस पुर्वेश सरनाईक मुंबई क्रिकेट असोशिऐशन अध्यक्ष विहंग सरनाईक प्रतिक रोचकरी उपस्थितीत होते.
श्रीतुळजाभवानी देविच्या पुजेचे पौराहित्य त्यांचे पारंपरिक पुजारी धनंजय गंगणे प्रशांत गंगणे यांनी केले .या नवसपुर्ती पोटी बोलताना सरनाईक म्हणाले कि श्रीतुळजाभवानी आमची कुलस्वामिनी असल्याने मी प्रत्येक वर्षी देवीदर्नशनार्थ येत असे मागील तीन वर्षा पुर्वि मुलांनवर तुझा कृपाआशिर्वाद राहु दे व त्यांचे चांगले होवु दे तुला ५१तोळ्याचा सुवर्ण पादुका व व २१तोळ्याचा सुवर्ण हार घालीन असे साकडे घातले होते त्यानंतर मुलांचे लग्ने झाले त्यांना मुला व मला नातवंडे झाले सर्वकाही चांगले झाले .त्या मुळे नवसपुर्ती पोटी यायचे होते पण दोनवर्ष कोरोना मुळे येता आले आम्ही दरवर्षी नाही आता आलो नवासपुर्ति केली देविचे दर्शन घडले आनंद वाटला.
कोरोना संपताच गुरुवारी श्रीतुळजाभवानी मातेचा कुलधर्मकुलाचार करुन देवीचरणी पंचाहत्तर तोळे सोने अर्पण केला यानंतर मंदीर संस्थान वतीने त्यांचा सत्कार देविची प्रतिमा देवुन धार्मिकसहाय्यकव्यवस्थापक विश्वास कदम यांनी केला
---------------------------------
महानगर पालिका निवडणुक पार्श्वभूमीवर अयोध्या दौरा व गाठीभेठी - आ सरनाईक
श्रीतुळजाभवानी दर्शना नंतर पञकारांशी बोलताना सरनाईक म्हणाले कि दोन महिन्यात मुंबई महानगर पालिका निवडणुक लागेल असा अंदाज व्यक्त करुन मुंबई महानगर पालिका निवडणुक पार्श्वभूमीवर सध्या मतांचा राजकारणापोटी अयोध्या दौरा तसेच तेजस्वी यादव नातिश यादव गाठीभेठी चालु असल्याची टीका आदित्य ठाकरे च्या दौऱ्या बाबतीत नाव न घेता केली.
महाविकासआघाडी बाबतीत सध्या चर्चा असुन ती निवडणुका पुर्वी घडत असतात याला अर्थ नसतो महाविकासआघाडी जागा खेचण्या बाबतीत रसीखेच चालु झाल्याचे स्पष्ट केले . आघाडीतील जागा वाटप करताना खरी खेचाखेच होईल त्या नंतर कोन राहील कोन बाहेर पडेल हे कळेल त्यामुळे महाविकास आघाडी होईल का ? प्रश्न करुन महाविकासआघाडी वर प्रश्न चिन्ह निर्माण होईल.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे हवा तो वाटा मिळाला तरच आघाडीत राहतात अन्यथा राहत नाहीत असे वक्तव्य यावेळी केले मुंबई तील मराठा टक्का का घसरला हे उध्दव ठाकरे शिवसेनेला मराठा भाषिक प्रश्न विचारतील असे यावेळी म्हणाले.
माझा या दौऱ्याचा ईडी प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे यावेळी म्हणाले .