तुळजापूर / प्रतिनिधी-  

महाराष्ट्राची क्रीडासंस्कृती समृद्ध असून पारंपारिक खेळ अनेक आहेत.त्यांतून आपल्या संस्कृतीचे दर्शनही घडते.आपल्याकडे एकूणच खेळाला दुय्यम स्थान दिले गेलेले दिसते. क्रीडा आणि खेळाकडे आपण गांभीर्याने बघत नाही. खेळामुळे शारीरिक विकास साधतो व मानसिकता प्रबळ बनते. खेळ ही एक शारीरिक कला आहे. दररोज किमान अर्धा ते एक तास खेळ खेळला पाहिजे.पालकांनी आपल्या पाल्यांना खेळाविषयी सातत्याने सजग करणे आवश्यक असल्याचे मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले.

 तिसरी राज्यस्तरीय लाठी अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम विजेता चषक संघ पिंपरी चिंचवड, द्वितीय विजेता चषक संघ रायगड,तृतीय विजेता चषक संघ उस्मानाबाद तर चौथा विजेता चषक संघ सोलापूर यांना शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील व माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान चषक प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले की,लाठी काठी स्पर्धा पाहिली अन बालपण आठवतं तुळजाई नगरीत भविष्यात ही नाविन्यपूर्ण स्पर्धा आयोजित केल्या तरचं युवकांना प्रोत्साहन मिळेल,खेळाविषयी आवड निर्माण होईल,खेळ प्रकारामुळे शरीर निरोगी राहते,गावोगावी आज पारंपारिक खेळ अडगळीला पडले आहेत असे विधान स्पर्धा बक्षिस कार्यक्रम प्रसंगी केले.

 यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, क्रिडा अधिकारी कैलास लटके,आयोजक शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमूख शामलताई वडणे, अजय शहा,लाठी इंडिया डायरेक्टर महंमद रफी, महागुरू सुभाष मोहिते,अध्यक्ष लाठी महाराष्ट्र प्रा.युसूफ मुल्ला,रायगड सचिव प्रियंका गुंजल, अध्यक्ष उस्मानाबाद जिल्हा अनिल सगर,सचिव लाठी महाराष्ट्र सुराज मोहिते,सुरेंद्र शिंदे,चंद्रकांत रायन,शिवराम भोसले,माजी उपजिल्हा प्रमुख शाम पवार,शहराध्यक्ष सुधीर कदम, युवा जिल्हा सरचिटणीस लखन परमेश्वर, बाळासाहेब शिंदे, सुनील जाधव,सौदागर जाधव, प्रतीक रोचकरी सोमनाथ गुरव,ऍड.गजाजन चौगुले,दीपाली साठे, बालाजी पांचाळ सिद्राम कारभारी,विकास भोसले, शरीफ शेख यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले तर आभार शाम पवार यांनी मानले.

 
Top