तुळजापुर/ प्रतिनिधी-
त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त सोमवारी राञी श्री मुदग्लेश्वर मंदीर येथे तिरुपती बालाजी दर्शन महापुजा मांडण्यात येवुन दिपोउत्सव साजरा करण्यात आला . मुदग्लेश्वर सेवा समिती तर्फे दीपावलीमध्ये श्री मुदग्लेश्वर मंदिर येथे दिपोउत्सव साजरा करण्यात आला.
: वैकुंठ चतुर्दश हरी हर मिलन
चातुर्मासात भगवान विष्णू झोपी जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार महादेवानकडे असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर भगवान विष्णुकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात, त्यामुळे अस म्हणलं जातं की,या दिवशी ‘हरीहर भेट’ म्हणजे विष्णू आणि शंकर यांची भेट होते. आजच्या दिवशी महादेव आणि विष्णू यांच्या भेटी निमित्त आज मुदग्लेश्वर येथे तिरुपती बालाजी दर्शन महापूजा मांडण्यात आली.