परंडा/ प्रतिनिधी- 

परंडा- करमाळा मार्गवरील - खासापूरी रोड- करमाळा रोडवरील व पालखी मार्गावरील “संतसेना महाराज चौक “हा सन २००८ सालापासून लावलेला नामफलक अज्ञाताने पाडण्याचा प्रयत्न केला होता.रविवार दि.१३ रोजी नाभीक संघटना व वारकरी सांप्रदायांच्या वतीने तो नामफलक परत उभा करून त्याचे पुजन करण्यात आले.

वारकरी सांप्रदायातील महान संत व नाभीक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांनी समाजाला दिलेली शिकवण, उपदेश येणाऱ्या पिढीला व सर्वांना च आठवणीत राहावे या उद्देशाने संत एकनाथ महाराज पैठण .यांच्या पालखी मार्गावरील या चौकास वारकरी संप्रदाय व नाभीक संघटनेच्या वतीने सन २००८ साली “ संत सेना महाराज चौक” असे नामकरण देण्यात आलेले आहे. तेव्हापासून आज पर्यंत दरवर्षी संतसेना महाराज पुण्यतिथी व संत एकनाथ महाराज पालखी दिवशी या नामफलकाचे पुजन मान्यवरांचे हस्ते करण्यात येते . या चौकाची ओळख “संत सेना महाराज चौक “ अशी च आहे. परंतू काही दिवसापूर्वी अज्ञाताने हा नामफलक पाडण्याचा प्रयत्न केला. यामुळे वारकरी संप्रदाय व नाभीक समाजाच्या भावना दुखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. रविवार दि.१३ रोजी परंडा नाभीक संघटना व वारकरी संप्रदाया च्या वतीने या नामफलकाचे पुष्पहार घालून पुजन करण्यात आले . परत असा प्रकार झाल्यास नाभीक संघटना खपवून घेणार नाही. तालुका - जिल्हा व राज्य स्तरावर याची दखल घेतली जाईल असा ठराव यावेळी झाला. 

 यावेळी नाभीक महामंडळाचे युवक जिल्हाध्यक्ष  नागेश काशीद, संघटनेचे मार्गदर्शक किरण डाके, प्रकाश काशीद , नागेश यादव, विशाल काशीद, दिपक डाके, गणेश काशीद ,युवक तालुकाध्यक्ष .प्रितम डाके, ओंकार , आकाश काशीद , स्वप्नील जाधव,आण्णा लोकरे , बंडू डाके, विक्रम शिंदे , दत्ता डाके .कृष्णा काशीद,उदय काशीद आदि उपस्थित होते.


 
Top