उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महा आरोग्य शिबीर दि.27 नोव्हेंबर 2022 रोजी स्थळ कोटला मैदान परांडा उस्मानाबाद येथे होणार असून या महा आरोग्य शिबीर बाबत  जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्व नियोजनबाबत  चर्चा झाली या मध्ये रुग्णांना आवश्यक औषधी,आवश्यक मनुष्यबळ, रुग्ण वाहिका, पिण्याच्या पाण्याची सोय 24 तास लाइट व्यवस्था, पोलीस व्यवस्थापन,शिबीर ठिकाणची स्वच्छता आवश्यक प्रसिध्दी साहित्य व इतर अनुषंगीक बाबीच्या सोयी मध्ये कोणत्याही प्रकारची कसुर करू नये असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

 या महा आरोग्य शिबीरामध्ये मोफत आरोग्य तपासणी,कॅन्सर तपासणी , डोळयांची तपासणी,रक्तक्षय तपासणी, हदयरोग तपासणी,कान –नाक- घसा तपासणी,रक्त तपासणी, हाडांची तपासणी,ईसीजी तपासणी, सिकल सेल तपासणी, दंत तपासणी, रक्त गट तपासणी,चष्म्यांचे वितरण व औषध वितरण इत्यादीबाबत मोफत तपासणी दि.27 नोव्हेंबर 2022 रोजी स्थळ कोटला मैदान, परांडा  येथे करण्यात येणार आहे.

  तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या महा आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी  डॉ. सचिन ओम्बासे,मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, यांनी केले असून या बैठकीस राज्यस्तरीय नियेाजन अधिकारी  डॉ.धमेंद्र,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशिल चव्हाण व विविध विभागाचे प्रमुख सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हास्तरीय अधिकारी/कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते.  


 
Top