उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत शाश्वत विकासाची ध्येय संकल्पना या अंतर्गत गरीबीमुक्त व उपजिवीका वृध्दीस पोषक गांव तज्ज्ञ प्रशिक्षक पदावर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ.मनीषाताई शिवाजीराव राखुंडे-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी बाणेर रोड, पुणे यांच्यामार्फत नुकतेच दि. 13/11/2022 ते 16/11/2022 या कालावधीत त्रिवेणी आश्रम, मरकळ, ता.खेड, जि.पुणे येथे त्यांनी निवासी प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

सदरील उपक्रमाअंतर्गत सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांना प्रविण प्रशिक्षकाने प्रशिक्षण देऊन सदरील गावातील गरिबी, आरोग्य, बालक, जल, स्वच्छता, महिला बचत गट तसेच सुशासनासह पंचायत याविषयी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यामध्ये समन्वय साधन्याचे काम करावयाचे आहे. तसेच बालकांसाठी उत्तम आरोग्य, क्रिडांगण व पुरक पोषण आहार या महत्वाच्या विषयावर काम करावयाचे आहे. या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँगे्रस महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्तींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


 
Top