उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून परंडा येथील कोटला मैदानात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 27 नोव्हेंबर 2022 रोजी होणाऱ्या या शिबिराचा जास्तीत जास्त गरजूंना लाभ मिळावा यासाठी उस्मानाबाद शहरातील विजय चौक येथे बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांच्या वतीने जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानात आयुष्यमान भारत योजनेसह विविध आरोग्य योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.

धाराशीव (उस्मानाबाद) शहरातील गरजू रुग्णांना महाआरोग्य शिबिराची माहिती व लाभ मिळावा याकरिता बुधवारी (दि.23) जनजागृती शिबिर घेण्यात आले. यावेळी अजिंक्य आगलावे, गणेश जाधव, सौरभ निंबाळकर, सुरज राऊत, संकेत हातगुडे, अविनाश कदम, ओमकार मैरान, शुभम पांढरे,अक्षय माळी, अविनाश टापरे, बालाजी राऊत, आतिश माने, सौरभ सोलंकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top