उस्मानाबाद / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील  ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात पक्षीय कामकाज आढावा निमित्त जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद तालुका अध्यक्ष श्याम घोगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय उस्मानाबाद येथे आयोजित केली होती.

या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जीवनरावजी गोरे  यांनी उस्मानाबाद तालुक्यातील गावनिहाय ग्रामपंचायतींचा आढावा घेतला व मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी आपण  पूर्ण ताकदीने निवडणूक लढू व विजयी होऊ असे सर्व  पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आवाहन केले व या निवडणूक मध्ये राष्ट्रवादीचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला.

तसेच आज संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण घालून त्यांना अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आले. याप्रसंगी किसान सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव यांनी संविधान प्रस्ताविकाचे वाचन करून दाखविले.

तसेच 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना व शहिदांना स्मरण करून दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

या प्रसंगी बैठकीस राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जीवनरावजी गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, संपतराव डोके,प्रदेश युवती अध्यक्ष सक्षणाताई सलगर, जिल्हा उपाध्यक्ष सतीश एकंडे, वाजिद पठाण, कादर खान, तालुकाध्यक्ष श्याम घोगरे, शहराध्यक्ष आयाज शेख, उपाध्यक्ष मनोज मुदगल, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील, महिला तालुकाध्यक्ष रंजना भोजने, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष अविनाश तांबारे, सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष असद खान पठाण, सेवादल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, किसान सभा जिल्हा उपाध्यक्ष विलास पडवळ, माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत,  महेश नलावडे,तालुका उपाध्यक्ष  जयंत देशमुख, बालाजी शिंदे, विराट पाटील, दशरथ माने, महेश पडवळ,प्रशांत फंड, तालुका सरचिटणीस नितीन  चव्हाण, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष दत्तात्रय पवार, संगीता काळे, बालाश्री पवार, ॲड.योगेश सोन्ने पाटील, पंकज भोसले, रणवीर इंगळे, अमोल सुरवसे,सईद काजी, एस के इनामदार, बाळासाहेब खांडेकर, अरुण माने, विवेक साळवे भाऊसाहेब ननवरे, संजय कावळे,बलभीम गरड तसेच यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ,प्रदेश प्रतिनिधी, फ्रंटल सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष व कार्याध्यक्ष, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रवादी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top