उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद  शहरातील महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू मनसेच्या आंदोलनाच्या इशाऱ्या नंतर काम सुरू करण्यात आले आहे.

उस्मानाबाद शहरातील सर्व महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले होते वाहनधाकांच्या, नागरिकांच्या  तक्रारी वरून मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना इशारा वजा निवेदन देऊन आठ दिवसाच्या आत शहरातील सर्व महामार्गावरील खड्डे बुजवा अन्यथा संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडाला काळे फासले जाईल असा इशारा वजा निवेदन दिले होते याची गांभीर्याने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.


 
Top