उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना बदनाम करण्याचे भाजप सरकारचे सत्र सुरू आहे. या कृतीचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.१५ नोव्हेंबर रोजी प्रतिकात्मक खोके जाऊन भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

उस्मानाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आला. यावेळी मोदी तेरी हिटलरशाही....नहीं चलेगी, खोके सरकारचा जाहीर निषेध, वुय स्पोर्ट फॉर... आमदार जितेंद्र आव्हाड, एकही दहाड...जितेंद्र आव्हाड, ५० खोके...एकदम ओके, या सरकारचं करायचं काय ?...खाली मुंडकं वर पाय अशा घोषणा देत खोक्याला चप्पलने मारून त्याची होळी केली. यावेळी

जिल्हा उपाध्यक्ष सतीश एकंडे, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष असद पठाण, 

जिल्हा कार्याध्यक्ष संगीता काळे, जिल्हा उपाध्यक्ष श्वेता दुरुगकर, अप्सरा पठाण, विवेक साळवे, शेखर घोडके, उमरगा शहराध्यक्ष ख्वाजा बाबुलाल मुजावर, प्रेमचंद मुंडे, आकाश वडणे, दादा जगताप, वामनराव गाते,  आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top