उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 टाटा समाज विज्ञान संस्था, मुंबई, ग्रामीण परिसर तुळजापूर आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने  महाराष्ट्रातील विविध विद्याशाखेतील प्राध्यापकांसाठी “कम्युनिटी इंगेजमेंट इन न्यू एज्युकेशन पॉलिसी 2022”  या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या समारोप व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम टाटा समाज विज्ञान संस्था च्या तुळजापूर येथील कॉलेजमध्ये घेण्यात आला. 

या कार्यक्रमास  पोलीस अधीक्षक   अतुल कुलकर्णी यांना प्रमुख अतिथी म्हणुन आमंत्रित केले होते. योवळी विचारमंचावर टाटा समाज विज्ञान संस्था, तुळजापूर चे प्रोफेसर- रमेश जारे, माजी प्राचार्य- डॉ. सुदाम राठोड, संचालक- डॉ. दादाराव किर्तीराज व डॉ- संजय गवई यांची प्रमुख उपस्थितीती होती.

 भारत हे विकसनशील राष्ट्र आहे, त्यामुळे आपल्या देशात समुदाय विकास महत्त्वाचा असून त्यासाठी शासन, शिक्षण संस्था आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात   पोलीस अधीक्षकांनी केले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, विविध शिक्षण संस्थेतील प्राध्यापक, स्वयंसेवी संस्थेतील कार्यकर्ते आणि प्रशासनातील अधिकारी- कर्मचारी स्थानिक समुदायामध्ये प्रत्यक्ष जाउन त्यांच्या गरजा ओळखून त्यांना सहकार्य केले पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने समुदायाचा सर्वांगीण विकास होईल असे ते म्हणाले.


 
Top