उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 काव्य गझल व हजलच्या माध्यमातून केमिस्ट पुरवठा करीत असलेल्या औषधांच्या डोसासोबतच कवींनी शब्दांच्या लयबद्ध, ताल व सुरांची जोड देत उपस्थित श्रोत्यांना खिळवत मंत्रमुग्ध केले.

उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट आपल्या रस्ता उद्घाटन असोसिएशन व कलाविष्कार अकादमीच्यावतीने दिपावलीनिमित्त काव्य गझलचे आयोजन औषध भवनात दि.६ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते.

यावेळी कवी प्रा. शेखर गिरी यांनी ती हातातुनी सटकून जाते, धूळ समजून मला झटकून जाते या प्रेम कवितेपासून प्रारंभ केला तर हनुमंत पडवळ यांनी प्रेम पत्र सखीचे आज मला सापडले... हजल सादर करून उपस्थितांना प्रेमाच्या दुनियेत नेऊन सोडले. तसेच अश्विनी दाट यांनी कोण विचारेल तुला या कवितेच्या माध्यमातून बायको, सून, आजी व आई विषयीची महती व स्त्रीचे स्वागत करताना समाजात केली जाणारी स्त्रीची अवयव ना यावर प्रकाश टाकला. तर युवराज नळे यांनी अशी कशी ही दुनिया, श्वास पहिला स्त्रीचा रोज का मग गर्भ मारला जातो ? स्त्रीभ्रूणहत्येच्या विदारकेवर भाष्य केले. तसेच नडले माझे मी पण कळले नाही, केंव्हा गेला श्रावण कळले नाही या माध्यमातून मी पण आजच्या अहंकारावर जबरदस्त प्रहार केला. तर दास पाटील यांनी हाक मारता धडकी भरते, काय आता सांगू छातीमध्ये पण कळ उठते असे सांगत तारुण्यातल्या प्रेम कहानीला वाट मोकळी करून दिली. तसेच भागवत घेवारे यांनी नांदावयास ये तु माझ्या घरी तू विठोबा, लपवून ठेवली मी सुरी विठोबा व मेडिटेशन करण्यासाठी ईगतपुरीला, स्टेशन वरती विसरून गेला पाहुन बाला इगतपुरीला, माझे मला कळेना, तगमग मनाची काही केल्या संपेना... कवितेच्या माध्यमातून व्यसनाधीन झालेल्या व व्यसनात अडकलेल्यांची व्यथा मांडली. तर सुषमा सांगवी यांनी तू मला पाहिले आणि मी तुला पाहिले हरपले भान हरपले भान माझे या माध्यमातून कॉलेज जीवनातील प्रेमाच्या क्षितीजावर प्रकाश टाकला. तर राजेंद्र अत्रे यांनी का असे चक्र उलटेच फिरायला लागले ? हे पुरोगामी मनुवादी होऊ लागले... असे म्हणत सध्याच्या राजकीय घडामोडींचा खरपूस समाचार घेत राजकारणाविषयी लोकांनी विशेषतः कवींनी राजकारण्यावर आसूड ओढले पाहिजेत असे ठणकावून सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी राजेंद्र अत्रे होते. या मैफिल काव्य गझल व हजलमध्ये प्रा अरविंद हंगरगेकर, भागवत घेवारे, हनुमंत पडवळ, अश्विनी धाट, प्रा शेखर गिरी, बाळ पाटील, सुषमा सांगळे, अंजली फिसरेकर, दास पाटील, युवराज नळे आदी कविंनी भाग घेतला. प्रास्ताविक उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष धनाजी आनंदे यांनी तर सूत्रसंचालन दौलत निपाणीकर व हनुमंत पडवळ यांनी तसेच उपस्थितांचे आभार रोहीत फिसरेकर यांनी मानले. या कार्यक्रमास श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top