उस्मानाबाद / प्रतिनिधी-
भारतीय संविधान दिन जि.प. आदर्श कन्या शाळेत आगळ्या वेगळ्या उपक्रमात मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. आज सकाळी ठीक 10 तेरणानगर बीट विस्तार अधिकारी जोशी के.ए. केंद्रप्रमुख जाकते जे. के आणि नांदेड पोलिस स्टेशनचे पोलिस सहाय्यक निरीक्षक पण या गावचे सुपूत्र मा. श्री. महेश लांडगे व केंद्रीय मुख्याध्यापक केशव पवार या पाहुण्यांच्या उपस्थित भारतीय संविधान दिन आगळ्या वेगळ्या उपक्रमाणे मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.
यासाठी दोन दिवसापूर्वी पासून सर्व शिक्षकांनी मोठी जय्यत तयारी केली होती . यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने कल्पकतेने व्यासपीठाची रचना करण्यात आली होती . संविधान दिनाचे औचित्य साधन शाळेच्या डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम या बालवाचनालयात शिक्षणप्रेमी नागरिक पालक व शिक्षकांच्या आर्थिक मदतीने वर्धा येथून वाचनालय प्रमुख व जेष्ठ शिक्षक संजय देशटवाड यांनी व प्रवीण गाडे सरांनी संविधानाच्या 100 प्रती वर्धा येथून मागवून घेतल्या होत्या त्यांची योग्य रचना व्यासपीठावर केली होती.
त्या प्रती पैकी 50 प्रती ह्या वाचनालयासाठी तर उर्वरित 50 प्रती शिक्षक विद्यार्थी व पालकांनी खरेदी केल्या त्याचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते येथे करण्यात आले. तत्पुर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ धायगुडे यांनी केले. यात त्यांनी सर्वांना सर्वोतोपरी सहकार्य व कोणत्याही उपक्रमास प्राधान्य देवू असे अश्वासन दिले.
त्यानंतर संविधानाचा संपूर्ण इतिहास हा श्री. संजय देशटवाड सरांनी सांगितला अगदी महत्वाच्या घडामोडी सह इनिहास समोर ठेवला हे त्यांच्या इतिहासाच्या गाढा अभ्यासावरून दिसून आले. तेरणानगरच्या बीट विस्तार अधिकारी जोशी मॅडम यांनी कन्या तडवळे येथील विविध उपक्रमांची यशोगाथाच सर्वांसमोर मांडली विविध उपक्रमाची मोठ्या प्रमाणात स्तुती केली व संविधाना दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. पोलिस निरीक्षक महेश लांडगे यांनी संविधानातील कलमांचा उपयोग आपले कर्तव्य करताना आमलांत आणून कर्तव्य केली तर ती एक प्रकारची देशसेवाच होईल कलमांचा वापर कर्तव्ये करताना निश्चित करा.असे त्यांनी अव्हान सर्वांना केले. संविधान दिनाच्या शुभेच्छा व 26/11 च्या मुंबई दहशत वादी हल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहून विचार मांडले.
मुख्याध्यापक रहिमान सय्यद यांनी सर्वप्रथम सर्वांना संविधानाच्या सर्वांना शुभेच्छा देवून 26/11 च्या शहीदांना शाळेच्या वतीने श्रद्धांजली वाहून आपले विचार मांडले यात त्यांनी संविधान दिनाचे महत्व व त्यातील सर्व कलमांचा जीवनातील महत्व याची सांगड घालून आपले जीवन विना संकट व योग्य रीतीने जगता येते हे सांगतांना शाळेतील सर्व उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य राहील. शाळेतील सुसज्ज वाचनालय त्यात असणारे 3351 ग्रंथ/ पुस्तके त्यांचा शाळेत होणारा वापर , संगित साधना मध्ये श्रीम. राणी अंधारे यांनी शाळेतील 12 विद्यार्थीना संगितामध्ये विशारद परीक्षा क्र.1 विशेष प्राविण्यासह स्वतःसह उत्तीर्ण होणे हे कार्य शक्य करून दाखवले. तर स्काऊट गाईड, पोषण बाग, तंत्रतानाचा वापर करून अध्यापन पध्दती , अशा विविध उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली व मान्यवरांच्या सूचनांचे पालन करून आणखी यापेक्षा उत्कृष्ट कार्य करू असे अश्वासन दिले.
शेवटी शिष्यवृत्ती पात्र 42 विद्यार्थीं नींना पेन भेट देवून मा.विस्तार अधिकारी मॅडम यांनी उपस्थितासह सत्कारीत केले . व संविधान प्रती वितरीत केल्या. शेवटी गणपती यावलकर यांनी उपस्थितांचे आभार व कार्यक्रमाचा समारोप केला .