उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरात वैराग नाका वीर फकीरा नगर येथे क्रांती पिता लहुजी वस्ताद साळवे यांच्या 228 व्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

  यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम क्रांती पिता लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शहर पोलीस ठाण्याचे एपीआय बाबासाहेब कांबळे , बीट अंमलदार विशाल चव्हाण हे उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे आयोजन मिलिंद आप्पा पेठे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मिलिंद पेठे , अमर गायकवाड ,शुभम पेठे, ओम पेठे, गणेश थोरबोले, कनुल देवकुळे ,अभिषेक बाबर ,आकाश देवकुळे, राहुल कांबळे , सोनल देवकुळे , दीपक व मिलिंद आप्पा पेठे मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top