तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर येथील दोन्ही महाद्वारा समोर विविध प्रकारचे  अतिक्रमणे  वाढल्यामुळे  मंदीरात जा ये करणाऱ्या  भाविकांना  याचा मोठा ञास सहन करावा लागत आहे.

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ मंगळवार -शुक्रवार -रविवार पोर्णिमा दिवशी लाखोच्या संख्येने भाविक येतात  येथे असणाऱ्या पायऱ्या सुध्दा अतिक्रमण विळख्यात सापडल्या आहेत. माञ महाद्वाररा समोर अतिक्रमणे वाढल्यामुळे मंदीरात जा ये करण्यासाठी भाविकांना  अक्षरशा  कसरत करावी लागते त्यातच बांगड्या विक्रेता महिला येथेच बसुन व्यवसाय करीत असल्याने फुटलेल्या बांगड्यांचे काचा रस्त्यावर पडत असल्याने यावरुन जाताना पायात घुसुन भाविक जखमी होत आहे हे कमी काय म्हणून येथे मोकाट जनावरे दुचाकी लावल्या जात असल्याने भाविकांचा ञासात भर पडत आहे हे आजच नाही तर गेली अनेक वर्षापासून येथे  अतिक्रमणे असुन ते दिवसेंदिवस कमी होण्या ऐवजी वाढत आहेत.

श्रीतुळजाभवानी समोरील  परिसर सुरक्षेचा दृष्टीने महत्त्वाचा आहे माञ अतिक्रमणामुळे मंदीराची सुरक्षा धोक्यात येत आहे.विशेष म्हणजे येथे हायपावरचे सीसीटीव्ही आहेत तरीही अतिक्रमणे होत असल्याने हा परिसर मंदीर सुरक्षा दृष्टीने  धोकादायक बनण्याची शक्यता असल्याने  श्रीतुळजाभवानी मंदीर व हा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य ती उपाययोजना प्रशासकीय पातळीवर होणे गरजेचे बनले आहे.


 
Top