तुळजापूर / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (खानापूर ते कर्नाटक सरहद ) चे चौपदरीकरणाचे काम गेल्या आठ ते दहा वर्षांपासून अत्यंत धीम्यागतीने सुरु असून या रेंगाळलेल्या व अर्धवट महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम तात्काळ सुरु करून काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद करण्यात यावी . या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या नेतृत्वाखाली जळकोट ता. तुळजापूर येथे दि . १९ नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी १२ वा .भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक नळदुर्ग यांना दिले आहे.

  तरी हे रेंगाळलेले महामार्गाचे सर्व ठिकाणचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे व हि सर्व कामे पूर्ण होईपर्यंत टोल नाके बंद करून सक्तीची वसुली थांबवावी. या प्रमुख मागणीसह झोपेचे सोंग घेतलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी हा रास्ता रोको करण्यात येत आहे. असेही निवेदनात शेवटी म्हटले आहे . निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, उपजिल्हाध्यक्ष महेश जाधव, अविनाश साळुंके, जिल्हासचिव ज्योतिबा येडगे, तुषार क्हाडे, तुळजापूर तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, उमरगा तालुकाध्यक्ष हरी जाधव, लोहारा तालुकाध्यक्ष अतुल जाधव आदींच्या सह्या आहेत .


 
Top