तेर / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांची पालखी कार्तिक सोहळ्यासाठी प्रस्थान झालेल्या पालखितील पादुकांना ३ नोव्हेंबरला पालखी पहाटे पंढरपूरला पोहचतात चंद्रभागा नदीत पादुकांना  स्नान घालण्यात आले.                                                    

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे ३ नोव्हेंबरला तेरहून प्रस्थान झाले.हि   पालखी सोहळा दि. २६आँक्टोबर  हिंगळजवाडी , दि. २७  रोजी उस्मानाबाद शहरात दाखल होत असून , दि. २८ भातंबरे येथील मुक्कामानंतर ,  दि.२९  रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे  29 आँक्टोबर रोजी  वैराग , दि.३० यावली , दि.३१ खैराव , दि.१ नोव्हेंबर रोजी अनगर , दि.२ रोपळे   या गावी मुक्काम करून गुरुवार दि.३  नोव्हेंबर रोजी  पहाटे हा पालखी सोहळा पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तिरावर   दाखल झाला.त्यानंतर श्री. संत गोरोबा काका यांच्या पादुकांना चंद्रभागा नदीत स्नान घालण्यात आले.श्री संत गोरोबा काका यांची पालखी पंढरपूरला आलेली आहे ही माहिती भाविकभक्तांना कळताच दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती

 4  नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीच्या मुख्य सोहळ्या नंतर पंढरपूरातील पाच दिवसांच्या मुक्काम संपवून मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी तेरच्या दिशेने  निघणार आहे .परतीच्या प्रवासाला सुरुवात होऊन येवती , खंडोबाचीवाडी  , कुंभेज , कापसेवाडी , काळेगाव , साकत , पिंपरी , कौडगाव , सांजा , काजळा मार्गे मजल दर मजल करत शुक्रवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी गोरोबा काकांच्या पायी पालखी सोहळ्याचे तेर नगरीत आगमन होणार आहे .


 
Top