परंडा / प्रतिनिधी - 

येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय परंडा या महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख प्रा.डॉ. विद्याधर नलवडे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. अक्षय घुमरे, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा डॉ सचिन चव्हाण आणि रसायनशास्त्र विभागाचे प्रा अमर गोरे पाटील यांना नुकतीच जागतिक संशोधक यादीमध्ये जागतिक  संशोधक म्हणून त्यांची निवड झाली आहे. यापूर्वीही या महाविद्यालयातील प्राध्यापकांची निवड झाली असून या प्राध्यापकांनी आपल्या संशोधनाचा दर्जा वाढवल्यामुळे आणि झालेलं संशोधन हे देशाच्या हिताचे असल्याने त्यांना जागतिक संशोधक हा दर्जा प्राप्त झाला आहे .त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल महाविद्यालयातील कला शाखेतील प्राध्यापक मराठी विभाग प्रमुख डॉ हरिश्चंद्र गायकवाड आणि प्रा डॉ गजेंद्र रदील  यांनी  या यशस्वी प्राध्यापकांना प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या चारही प्राध्यापकांचा शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा डॉ शहाजी चंदनशिवे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ अरुण खर्डे, हिंदी विभाग प्रमुख प्रा डॉ भीमराव माने , डॉ बाळासाहेब राऊत वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख  डॉ प्रकाश सरवदे, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा डॉ प्रशांत गायकवाड प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ अतुल हुंबे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा डॉ संभाजी गाते, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ विशाल जाधव ,प्रा दीपक हुके, शिक्षकेतर कर्मचारी बबन ब्रह्मराक्षस आदी यावेळी उपस्थित होते.


 
Top