उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शोषित, वंचित कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन महाराष्ट्रमध्ये गरिबीमध्ये जीवन जगत असलेल्या गरिबांच्या फायद्याच्या योजना आखाव्यात.  त्याची सक्षमपणे अंमलबजावणी करुन ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समितीच्यावतीने पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महागाईच्या भस्मासुरात गरीबांचे जीवन आणखी खालावले जाईल व गरीबांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत जाईल. तसेच गरिबांच्या, मजुरांच्या हाताची कामे यंत्रांच्या घशात गेली असल्यामुळे गरीब कामगारांच्या हाताला काम नाही. त्यांची मुले-मुली बेरोजगारीच्या विळख्यात अडकून बसली आहेत. त्यासाठी त्यांना बेरोजगार भत्ता,, बिनव्याजी कर्ज तात्काळ देऊन त्यांच्या हाताला काम द्यावे. तसेच छोट्या-मोठ्या शहरासह ग्रामीण भागातील हे गरीब लोक झोपडपट्टीमध्ये राहत आहेत. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे. विशेष म्हणजे आर्थिक दुर्बल घटकातील आर्थिक विषमता झपाट्याने वाढत असल्यामुळे गोरगरिबांच्या आत्महत्या व अपघातात शेकडो जाणांचे मृत्यू होत आहेत. त्यातच महागाई, बेरोजगारी व हाताला काम नाहीत. उदारनिर्वाह चालवायचा कसा ? या विवंचनेत लाखो कुटुंबे आव असून आपणाकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहेत. त्यामुळे वरील सर्व बाबींचा सखोल विचार करून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय दृष्ट्या प्रगतशील बनविण्यासाठी आपण आपल्या स्तरावर प्रयत्न करून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच गरीबी निर्मूलन करण्यासाठी कायदा करण्यात यावा, गरीबी निर्मूलनासाठी आर्थिक बजेची तरतूद करण्यात यावी व गरीब कुटुंबाकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे त्यांना महागाई वाढ व कुटुंबाची मोलमजूरी विना उदारनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांना मासिक आर्थिक सानुग्राह अनुदान देण्यात यावे तसेच राज्यस्तरावर विविध कल्याणकारी योजनांच्या देखरेखीसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा अशी मागणी केली आहे. 

यावर अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष भाई फुलचंद गायकवाड, मराठवाडा अध्यक्ष अशोकराव बनसोडे, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष आप्पासाहेब मस्के आदींच्या सह्या आहेत.


 
Top