उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कोणतेही काम चिकाटीने काम करत राहिले पाहिजे. तसेच लहान कामातून सुरुवात केल्यास त्याचा मोठा वटवृक्ष तयार होऊ शकतो असे मत पांडुरंग घोडके यांनी व्यक्त केले.

उस्मानाबाद तालुक्यातील काजळा येथे उषा इंटरनॅशनल कंपनी दिल्ली, अफॉर्म पुणे व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उषा शिलाई शाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिरीष देशपांडे, बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे, एबीपी माझाचे काकासाहेब कांबळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना घोडके म्हणाले की, उषा शिलाई प्रकल्प व शिलाई प्रशिक्षणातून महीलांनी मशीन फिटींग करणे, नवनवीन व आकर्षक ब्लाऊज, ड्रेसची कटिंग व शिवणकाम उत्तम प्रकारे निवासी राहून परिपूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच यापुढे गावातील इच्छूक व गरजू महिलांना प्रशिक्षण देऊन व्यवसाय वाढविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र यासाठी प्रत्येकाने सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उषा शिक्षिका सपना सुनील कांबळे यांनी प्रकल्पात झालेल्या निवडीबद्दल तसेच अनपेक्षित मिळालेल्या उत्कृष्ट प्रशिक्षणाबद्दल आपले अनुभव व्यक्त केले.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार वर्षाराणी काकासाहेब कांबळे यांनी मानले. यावेळी उषा क्षीरसागर, मोहिनी राऊत, छाया इंगळे, वैशाली शिंदे, पार्वती पवार, राणी क्षीरसागर आदीसह महिला उपस्थित होत्या.


 
Top