उस्मानाबाद / प्रतिनिधी-
लोहारा तालुक्यातील मौजे जेवळी येथील राम तिम्मा दंडगुले यांना भूखंड क्रमांक बी 83 हे मंजूर असून अद्याप ते घरापासून वंचित आहेत तरी आपल्याच कार्यालयाच्या मंजूर यादी प्रमाणे त्यांच्या भूखंडावरील केलेले अतिक्रमण काढून द्यावे व भूखंड क्रमांक बी 83 व 98 या भूखंड क्रमांकाच्या मूळ कबालीची नक्कल देण्यात यावी.
जेवळी येथील रामा तिम्मा दंडगुले यांना भूखंड क्रमांक बी 83 हे मंजूर असल्याचे आपले कार्यालय सांगत आहे परंतु सदरील व्यक्ती हा त्या घरापासून वंचित असल्याचे आपल्या निदर्शनास आणून सुद्धा आपण त्या व्यक्तीला का न्याय देत नाही यासाठी तहसीलदार लोहारा जिल्हाधिकारी उस्मानाबाद, विभागीय आयुक्त औरंगाबाद , असे अनेक ठिकाणी आंदोलन करून आपण न्याय देत नाही परंतु 2018 ला आपलेच कार्यालय पत्र देऊन रामा तिम्मा दंडगुले यांच्या नावाने बी 83 हा भूखंड मंजूर आहे असे सांगत आहे आणि रामा तिम्मा जेवळीकर यांच्या नावाने भूखंड क्रमांक बी 98 हे मंजूर आहे ते दिलेले लेखी पत्र निवेदनासोबत जोडुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फकीरा ब्रिगेडच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता.
दोन नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फकीरा ब्रिगेडच्या वतीने आमरण उपोषण मराठवाडा अध्यक्ष श्रीरंग सरवदे यांच्यासह दंडगुले परिवार आमरण उपोषण करत आहे.