उस्मानाबाद / प्रतिनिधी -

शहरातील  शहरातील ठाकरे नगरमधील अष्टविनायक चौक येथे माता येडेश्वरी स्वयंरोजगार संस्थेच्या वतीने आयुष्मान भारत योजना कार्ड इ-केवायसी तसेच रक्तगट व नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सचिन देशमुख, ॲड.अजित खोत, डॉ.धाबेकर यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी शिवसेनेचे शहर उपप्रमुख तथा माता येडेश्वरी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रशांत (बापू) साळुंके,  अजित बाकले, रोहन गव्हाणे, स्वराज मुळे, प्रतिक कदम, आकाश कावळे, गणेश पाटील, जय सूर्यवंशी, प्रणव सरवदे, सोनू कांबळे, दत्ता सुकाळे, सुधीर बंडगर, श्रीकांत गोरे, गोविंद जांगीड, राहुल शर्मा उपस्थित होते.

शिबिरात जिल्हा शासकीय रुग्णालयाचे कर्मचारी शुभम जाधव, महिपाल खाडप, विनय कुंभार, नगर पालिकेतील आयुष्यमान भारत योजना कक्षाच्या नोडल अधिकारी वैशाली आवाड यांनी रुग्ण तपासणी व इ-केवायसी नोंदणीसाठी परिश्रम घेतले. शिबिरास शाहुनगर भागातील महिला, पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top