उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील रामकृष्ण सदनिका संकुलात व्यापारी महासंघाच्या जिल्हा सचिवपदी संस्कार भारतीचे सदस्य असलेले धनंजय जेवळीकर यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा संस्कार भारती समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

 या प्रसंगी देवगिरी प्रांत सहचित्रकला विधाप्रमुख तथा जिल्हा मार्गदर्शक शेषनाथ केशरबाई दगडोबा वाघ , जिल्हाध्यक्ष श्याम सुंदर भन्साळी, जिल्हासचिव प्रभाकर चोराखळीकर, जिल्हा संगीत विधाप्रमुख सुरेश वाघमारे सुंभेकर, जिल्हा नाटयविधा प्रमुख धनंजय कुलकर्णी, जिल्हा पदाधिकारी राजेंद्र भंडारी,मुकुंद पाटील मेंढेकर , सदस्य अक्षय भन्साळी, रेवती भंडारी उपस्थित होते.


 
Top