तुळजापूर/प्रतिनिधी 

 श्रीतुळजाभवानी शाकंभरी नवरात्रोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष निमित्त शनिवार, दिनांक : ०७ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी १० : ०० ते सायंकाळी ०६ : ०० वाजेपर्यंत इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी पर्यंत एकूण दोन गटात राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, स्पर्धा तुळजाभनीची. . . वक्ता महाराष्ट्राचा २०२३ (वर्ष १४ वे) तुळजाभवानी कला वाणिज्य महाविद्यालय, तुळजापूर येथे आयोजन करण्यात आले असून सदर स्पर्धेचे माहिती पत्रकाचे प्रकाशन  आमदार  राणाजगजितसिंह पाटील,   योगिता कोल्हे, सह अन्य मान्यवरांचा उपस्थितीत  करण्यात आले.

 यामध्ये आगामी शाकंभरी नवरात्र महोत्सव २०२३ मध्ये श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे वतीने सांस्कृतिक महोत्सव घेणेबाबत आश्वासन देण्यात आले.  

 या स्पर्धेत गट १ इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवीसाठी १) भारतीय स्वातंत्र्याची यशोगाथा २) माणसात देव शोधणारा संत- संत गाडगेबाबा ३) मला भावलेले आदर्श व्यक्तिमत्व ४) नारी सन्मान देशाचा अभिमान ५) मला खेळायचे आहे: मोबाईल नको हे पाच विषय असून यासाठी एका शाळेतून जास्तीत जास्त ०१ स्पर्धकाला प्रवेश देण्यात येणार आहे व वेळ ०५ मिनिटे, गट २ इयत्ता आठवी ते इयत्ता दहावीसाठी १) छत्रपती शिवराय: मॅनेजमेंट गुरु २) भारतीय तरुण: इतिहास व भविष्य ३) कधी थांबणार शेतकऱ्यांच्या आत्महत्या? ४) कोरोनामुळे काय कमावले व काय शिकले ५) वैभवशाली मराठवाडा हे पाच विषय असून यासाठी एका शाळेतून जास्तीत जास्त ०१ स्पर्धकाला प्रवेश देण्यात येणार आहे व वेळ ०७ मिनिटे स्पर्धेमध्ये पारितोषिके म्हणून  गट १ व २ साठी स्वतंत्र पारितोषिके प्रथम रोख रुपये ५०००/- चषक व प्रमाणपत्र, द्वितीय रोख रुपये ३,०००/- चषक व प्रमाणपत्र, तृतीय रोख रुपये २,०००/- चषक व प्रमाणपत्र, चतुर्थ रोख रुपये १,५००/- चषक व प्रमाणपत्र पाचवे रोख रुपये १,०००/-चषक व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ ०५ प्रत्येकी रोख रुपये ५००/- चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. 

तुळजापूर तालुक्यासाठी दोन्ही गटासाठी स्वतंत्र पारितोषिके प्रथम क्रमांक रोख रुपये १,५००/- चषक व प्रमाणपत्र द्वितीय १,०००/- चषक व प्रमाणपत्र तृतीय रोख रुपये ५,००/- चषक व प्रमाणपत्र  उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी रोख रुपये २५०/-  चषक व प्रमाणपत्र

  ह्या स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व शाळेसाठी खुल्या व विनामूल्य राहतील. प्रवेश स्वीकारण्याची अंतिम दिनांक : ०३ जानेवारी, २०२३ आहे. या स्पर्धेत  सहभागी होण्याचे आवाहन युवास्पंदन सामाजिक संस्था व मराठवाडा सामाजिक संस्था तुळजापूर यांनीकेले आहे,


 
Top