उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिंगोली आश्रम शाळेत बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष  कुमंत भागवत शिंदे मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे  अब्बास आली शेख यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

अध्यक्ष भाषणामध्ये श्री शिंदे सरांनी पंडित नेहरू बद्दल माहिती दिली. प्राचीन भारताचा इतिहास, संस्कृती, कला स्थापत्य यावर डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेहरू यांनी लिहिला, या पुस्तकाची माहिती सरांनी विद्यार्थ्यांना दिली आपण सुद्धा पंडित नेहरू सारखे कार्य केले पाहिजे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपला भारत देश उभा करण्यासाठी आपण सक्षम नागरिक बनले पाहिजे असा मौलिक सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आला. प्रमुख पाहुणे  शेख अब्बास शेख   यांनी विद्यार्थ्यांना अथक परिश्रमाने, नियोजनबद्ध पंडित नेहरूंनी जे कार्य केले आहे तसेच कार्य विद्यार्थ्यांनी करणे काळाची गरज आहे असे मार्गदर्शन केले. शिक्षक व विद्यार्थी भाषणे झाली. लहान मुलांचा गुलाब फूल देऊन सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील . आर. बी व आभार प्रदर्शन  दीपक खबोले मेसाई जवळगेकर यांनी केले.  बर्दापूर सूर्यकांत,    शानिम  कैलास कोकळगावकर,  पडवळ खंडू,  सुधीर कांबळे पळसपकर,  सुधीर राठोड सोलापूरकर, श्री सतीश कुंभार इत्यादी शिक्षक व कर्मचारी   भिसे वसंत,  सचिन माळी,   रेवा चव्हाण,  बबन चव्हाण,  रामलिंग आडे,  गोविंद बनसोडे इत्यादी कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top