उस्मानाबाद /प्रतिनिधी -

मराठवाडा शिक्षक मतदार नोंदणी संदर्भात दिनांक ३१/१०/२०२२ रोजी भाजपा कार्यालय ( प्रतिष्ठान भवन )  धाराशिव येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कौडगे, मराठवाडा प्रभारी मनोज पांगरकर, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण पाटील, भाजपा ‍जिल्हाअध्यक्ष नितीन काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस  धाराशिव जिल्हयातील भाजपा संस्था संघटना, भाजपा  शिक्षक आघाडी, महाराष्ट्र शिक्षक परिषद, विद्याभारती संघटना, विजाभज आश्रमशाळा कर्मचारी संघटना, इंग्रजी संस्था संघटना, इत्यादी संस्थेचे व संघटनेचे  पदाधिकारी,‍ शिक्षक, व कर्मचारी उपस्थित होते. 

 या बैठकीचे प्रास्ताविक श्री. पांडुरंग लाटे, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे प्रभारी व  जिल्हा संयोजक यांनी केले. तसेच या बैठकीस  जिल्हा संयोजक  सुधीर पाटील, विद्यानंद राठोड, गणेश एडके, रावसाहेब कोळगे, तालुका संयोजक सचिन पाटील, दिगबंर बंडगर, प्रभाकर मुळे, सुहास सरवदे, सुभाष वसंतराव जगताप, चंद्रकांत पवार, अभय चालुक्य, बाळू देवकर हजर होते.विविध  शिक्षक संघटनेचे  प्रतिनिधी विनोद राठोड, भास्कर बोंदर,  प्रविण मुळे, उमाकांत  कुलकर्णी, राम जोगदंड लक्ष्मण सुपनार इत्यादी हजर होत. त्याच बरोबर  शिक्षक मोठया संख्येन हजर होते.


 
Top