उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सर्वसामान्यांचे प्रश्न जगासमोर मांडण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा दि.७ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात दाखल झाली आहे. यासाठी उस्मानाबाद येथील काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ स्मिता शहापूरकर यांनी ५० महिला रणरागीणींचा ताफा घेऊन नांदेडकडे रवाना झाल्या आहेत.

यावेळी बोलताना डॉ स्मिता शहापूरकर म्हणाल्या की, सर्वसामान्य जनता त्रासून गेली असून त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस माजी अध्यक्ष खा राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली असून या यात्रेत लाखो लोक स्वतःहून जोडले जात आहेत.  कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही यात्रा काढण्यात आली  आहे.  

 यावेळी अलका मगर, शोभा कुंभार, अनिता अदाटे, मनिषा शिंदे, अर्चना पवार, सुरेखा गव्हाणे, साक्षी गव्हाणे, पद्मिनी पिंपळे, मनीषा राठोड, रंजना आडे, मनीषा आडे, कविता राठोड, वंदना चव्हाण, निर्मला आडे, पूजा राठोड, बालिका आडे, शोभा राठोड, रागिनी राठोड, इंदुबाई भराटे, अश्विनी शिंदे, कांचन भालेराव, पंचशीला वाघमारे, रेहमुन्नीसा शेख, रुबिना पठाण, छाया बाबर, रेश्मा शिंदे, साहिल शेख आदीसह ५० महिलांचा ताफा घेऊन रणरागिनी नांदेडकडे रवाना झाल्या आहेत.


 
Top