उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 नवी दिल्ली येथील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबई येथील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार उस्मानाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय योजनांची जनजागृती आणि लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्याकरिता योजनांचा महामेळावा रविवार, दि.13 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 09.00 वा. उस्मानाबाद नगर परिषद परिसरातील नाट्यगृहाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.

 विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा ए.एस.शेंडे आणि वरिष्ठ न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव यांनी केले आहे.


 
Top