उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्या वतीने मौजे वरुडा येथे 15 ते 21 नोव्हेंबर 2022 या सात दिवसाच्या कालावधीत विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले.

या विशेष श्रमसंस्कार शिबिरात मौजे वरुडा येथील जि. प . प्राथमिक शाळा, विठ्ठल मंदिर ,काळभैरवनाथ मंदिर ,दलित वस्ती ही सार्वजनिक  ठिकाणे स्वच्छ करण्यात आली .वरुडा गावच्या उत्तरेस असलेल्या ओढ्यामध्ये वनराई बंधारा बांधण्यात आला. या वनराई बंधाऱ्यामुळे ओढ्यात  पाणी साठवून आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरींना व बोरवेलला अधिक प्रमाणात पाणी वाढेल यासाठी हे उपयोगाचे आहे. तसेच जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या मैदानावर वृक्षारोपण करण्यासाठी 51 खड्डे घेऊन प्रातिनिधक स्वरूपात 21 झाडांचे वृक्षारोपण केले.

या शिबिरामध्ये सकाळी आठ ते बारा श्रमदान करण्यात आले दुपारी चार ते सहा या काळात सौ .अर्चना नरवडे (सहसंचालक, वित्त व लेखा विशेष अधिकारी) तसेच (उस्मानाबाद जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी)  डॉ. शरद लाकाळ  यांनी लंपि या रोगापासून

 जनावरांची मुक्तता कशी करावी व गोठ्यांची फवारणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना व शिबिरातील स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.पंचायत समिती  तालूका कृषी  अधिकारी श्री. डी.आर जाधव यांनी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महाराष्ट्र शासन, आणि भारत सरकारच्या कोणकोणत्या योजना आहेत त्या योजनांची माहिती दिली व तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाविषयी संपूर्ण माहिती दिली. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुती पिकांची कमतरता आहे त्या तुती पिकांची लागवड केल्यास शंभर टक्के अनुदान दिले जाते याविषयी शेतकऱ्यांच्या त्यांनी जनजागृती केली. कौशल्य विकास केंद्र उस्मानाबादचे श्री. संजय गुरव( सहाय्यक आयुक्त) यांनी कौशल्य विकास, उद्योजकता व स्पर्धा परीक्षा यावरती स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. प्रा नील नागभीडे, प्रा. डॉ. नितिन गायकवाड , प्रा.दत्तात्रय शिंदे, प्रा. राजा जगताप, प्रा. डॉ. मारुती लोंढे, प्रा. श्रीराम नागरगोजे, प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड, प्रा. डॉ. अवधूत नवले इत्यादी प्राध्यापकांनी स्पर्धा परीक्षा,व्यक्तिमत्व विकास, भारतीय संविधान, राष्ट्रीय सेवा योजना शिबिर व सामाजिक मूल्य, या विविध विषयावर व्याख्याने दिली.

विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी श्री. विश्वासराव शिंदे (सदस्य,महाविद्यालयीन विकास समिती)  यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की,”विद्यार्थ्यांनी आपली प्रगती साधत असताना सामाजिक बांधिलकी जोपासावी व देशहिताला प्राधान्य देऊन देश बलशाली करण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन केले.”

याप्रसंगी शिबिर समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य जयसिंगराव देशमुख म्हणाले की,”विद्यार्थ्यांनी ग्रामीण जीवन अनुभवताना आपला व्यक्तिमत्व विकास साधावा तसेच वरूडा गावातील ग्रामपंचायतींनी आमच्या महाविद्यालयाला श्रमदानाच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी दिली त्यामुळेच आम्हाला श्रमदानाच्या माध्यमातून गावातील विविध कामे करता आली असे गौरवोद्गार काढले.”

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाद्वारे कार्यक्रमाधिकारी प्रा.माधव  उगिले यांनी शिबिरार्थींच्या श्रमदानातून सात दिवसात केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. ग्रामस्थांच्या वतीने प्रा. संजय शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले .यावेळी श्रमसंस्कार शिबिरातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्राथमिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. यावेळी संदीप देशमुख प्रा एस. एस. फुलसागर प्रा. डॉ. महाडिक सर वरूडा ग्रामपंचायतचे सरपंच, लखन ईटकर, ग्रामपंचायत सदस्य गंगावणे, मुख्याध्यापिका सौ.

 रामुगडे इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ.शिवाजीराव गायकवाड यांनी केले, तर आभार प्रा. बालाजी नगरे यांनी मानले. सदर श्रमसंस्कार शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा.माधव उगीले .  प्रा. नगरे बी. के.प्रा.मोहन राठोड,  प्रा. डॉ.शिवाजीराव गायकवाड.प्रा.सौ स्वाती बैनवाड  प्रा. चौखंडे , प्रा.सौ. वनिता बाबर,  तर सेवक श्री.दादा माळी श्री. मुळे मामा यांनी परिश्रम घेतले. या शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य जयसिंगराव देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.


 
Top