उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे हे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात उस्मानाबाद दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन असून धाराशिवचा दौरा राज्यात प्रभावी होईल, असे प्रयोजन असल्याची माहिती भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांनी दिली.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात पाच किंवा सहा तारखेला त्यांचा धाराशिव दौरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्वनियोजन बैठक येथील भाजपा कार्यालय, प्रतिष्ठाण भवन येथे झाली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नेताजी पाटील, माजी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, सुधीर पाटील, ॲड. नितीन भोसले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

संघटनमंत्री संजय कौडगे म्हणाले की, दिवसभराचा हा दौरा असून या दौऱ्यात दिवसभरात कोणते काय कार्यक्रम घ्यायचे याची रुपरेषा प्रदेशाकडून निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार भाजपाचा जिल्हा संघटनात्मक मेळावा, भाजयुमोची बाईक रॅली, विविध बैठका, पत्रकारांशी वार्तालाप, युवा शोखेचे उदघाटन, केंद्र शासनाच्या लाभार्थ्यांकडून धन्यवाद...मोदीजी अशा आशयाचे पोस्ट कार्ड लिहुन घेणे, बूथ स्तरावरील पोस्ट कार्ड लिहुन घेणे, बूथ स्तरावरील बूथ कमिटीची बैठक, नवमतदारांशी संवाद साधने, नियोजित जिल्हा भाजपा कार्यालय इमारत भुमिपूजन आदी कार्यक्रमाचा त्यात समावेश आहे. अशी माहिती दिली. जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच धाराशिवच्या दौऱ्यावर येत आहेत.

 या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार असून उस्मानाबादचा हा दौरा राज्यात एक आगळावेगळा आणि प्रभावशाली ठरणारा असले. या दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या नियुक्त करुन अनेकांवर जबाबदारी दिली जाईल सांगीतले. राज्यात विविध जिल्हयात बावनकुळे यांचे मोठे स्वागत होत असून धाराशिवच्या कार्यक्रमाचे राज्यात वेगळेपण दिसावे यासाठी ज्यांना जी जबाबदारी मिळे त्यांती ती यशस्वतीरीत्या पार पाडावी, असे नितीन काळे यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी बैठकीची रुपरेषा मांडून प्रदेश अध्यक्षांचा हा दौरा यशस्वी करावा, असे सांगितले. या बैठकीस नेतीजी पाटील, ॲड. मिलींद पाटील, माजी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, सुधीर पाटील, ॲड. नितीन भोसले, धाराशिव शहर व ग्रामीण जिल्हयातील भाजपाचे जिल्हा पदाधिकारी, मंडळाचे अध्यक्ष व इतर अनेकांची उपस्थिती होती.


 
Top