तुळजापूर  / प्रतिनिधी-

भारत जोडो याञा पार्श्वभूमीवर  नायगाव (जि. नांदेड) येथे गुरुवार दि.१० रोजी आगमन होताच  कॉंग्रेंसचे नेते खा. राहुल गांधी यांना माजी पंतप्रधान स्व.इंदिराजी गांधी , माजी पंतप्रधान राजीव  गांधी , श्रीमती सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या असतानाची प्रतिमा व कवड्याची माळ उस्मानाबाद िजल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. धीरज पाटील यांनी दिली.  यावेळी त्यांनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी निमंत्रण देऊन भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला. 

 यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटिचे अध्यक्ष  नानाभाऊ पटोले , कार्याध्यक्ष  विश्वजीत कदम , कार्याध्यक्ष बसवराज पाटील ,  भाई जगताप आदि उपस्थित होते .


 
Top