उस्मानाबाद / प्रतिनिधी-

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत २०२१-२२ या वित्तीय वर्षातील उस्मानाबाद नगर परिषदकडील मंजुरी विकास कामाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी उस्मानाबाद येथील देवानंद मुरलीधर एडके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२२ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

मागासवर्गीय वस्तीमध्ये आजपर्यंत कसल्याही प्रकारची नागरी सुविधाचे काम झालेले नसल्यामुळे दलित समाज हा संविधानीक अधिकारापासून वंचित राहत आहे. त्यामुळे २०२१-२२ च्या मंजुर विकास कामाचे जाणीवपूर्वक टाळाटाळ करुन अमंलबजावणी न करणाऱ्या प्रवृत्तीचा तपास करुन त्यावर अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत कारवाई करुन विकास कामाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.


 
Top