उस्मानाबाद / प्रतिनिधी-
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक . एम. रमेश यांसह पथक जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी गस्तीवर गेल्यानंतर त्याना उमरगा येथे ३ लॉजवर अनैतिक देह व्यापार सुरू असल्याचे समजात त्यांनी छापे मारून त्यांना अटक केले.
गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, उमरगा येथील ‘हर्ष लॉज’ , ‘सुहाणा लॉज’ व ‘अभिराज हॉटेल’ या तीन हॉटेल- लॉजचे चालक, मालक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पथकाने सदर माहिती पोलीस अधीक्षकांना देउन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरगा रमेश बरकते, उमरगा पो.ठा. चे पोनि- मनोज राठोड, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोनि- के.एस. पटेल, पोउपनि- चाटे यांसह पोलीस अंमलदार यांच्या पथकाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी तीन वेगवेगळे पथक तयार करुन नमूद तीन्ही लॉजवर छापे टाकले असता 04 पिडीत महिला गुजरात व पश्चिम बंगाल असे बाहेर राज्यातून आणुन त्यांचे कडून वैश्या व्यवसाय करुन घेत असताना लॉज व हॉटेल चालक, मालक व ग्राहक असे एकुण 12 व्यक्तींना पोलीस ठाणे उमरगा येथे आणुन त्यांच्या विरुध्द मानवी अनैतीक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम- 3,4,5 सह भा.दं.सं. कलम- 370, 370 (अ) (2) प्रमाने 03 वेगवेगळे गुन्हे दाखल करुन सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस अधिक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरगा रमेश बरकते व अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्ष, उस्मानाबाद चे पोनि- पटेल हे करत आहेत.