उस्मानाबाद / प्रतिनिधी  

 येथील  रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील वाणिज्य विभाग  आणि कंजूमर गाईडन्स सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. 

सदर कार्यशाळेसाठी सीजीएसआय चे प्रकल्प व्यवस्थापक श्री टी.आर. पांडे आणि श्री नंदकुमार मेमन साधन व्यक्ती म्हणून लाभले होते श्री पांडे यांनी ग्राहक वाद या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्राहकांनी वस्तूची खरेदी करताना कशा पद्धतीने सावध राहिले पाहिजे. वस्तू खरेदी नंतर जर फसवणूक झाली तर कोणत्या ठिकाणी ग्राहकाला दाद मागता येते व झालेल्या नुकसानीतून भरपाई कशा पद्धतीने करता येते. याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले. तर श्री. नंदकुमार मेमन  यांनी आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, गुंतवणूक दारांनी गुंतवणूक करताना कोणत्या ठिकाणची गुंतवणूक गुंतवणूक दारांना  फायदेशीर ठरते. तसेच कोणत्या गुंतवणुकी ग्राहकांना अधिक लाभ मिळवून देतात. गुंतवणूक अधिक काळासाठी असावी का अल्प काळासाठी. गुंतवणूक कोण करू शकतो?. या विषयावर सविस्तर अशी चर्चा घडवून आणली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व प्रमुख पाहुण्याची ओळख वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख प्रा. बालाजी नगरे यांनी करून दिली. सदर चर्चा सत्र तीन विभागामध्ये घेण्यात आले. पहिले सत्र बी. कॉम भाग तीन या विद्यार्थ्यांसाठी पार पडले त्यामध्ये प्रा. भोवाळ यांनी सूत्रसंचालन केले व प्रा. निंबाळकर यांनी आभार मानले. दुसरे सत्र बी. कॉम भाग दोन साठी पार पडले त्यात डॉ.अवधूत नवले यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा. सुप्रिया शेटे यांनी आभार मानले आणि तिसरे सत्र बी. कॉम भाग एक व बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी पार पडले त्यात प्रा. देशमाने यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. माने यांनी आभार मानले. सदर चर्चा सत्र महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

 सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top