उस्मानाबाद /प्रतिनिधी -

थोर स्वातंत्रसेनानी, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद येथे जिल्हा काँग्रेस कार्यालयात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

जिल्हा काँग्रेसचे मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने व उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या शुभहस्ते पुष्पार्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. अभ्यासक सुनील बडूरकर यांनी नेहरूंच्या स्मृतीस उजाळा दिला.

कार्यक्रमास शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, जावेद काझी, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद सपकाळ, युवक काँग्रेसचे स्वप्नील शिंगाडे, संजय गजधने, महादेव पेठे, विद्यार्थी काँग्रेसचे सौरभ गायकवाड, खय्युम सय्यद, संतोष पेठे उपस्थित होते.

सूत्रसंचालन शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी केले तर आभार सरचिटणीस जावेद काझी यांनी मानले.

 
Top