उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्यपाल भगतसिंग कोशयारी व भाजप प्रवक्ते सुधान्शु त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे.

याच्या निषेधार्थ उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाने जोरदार निदर्शने करून जोडो मारो आंदोलन केले.“राज्यपाल कोशयारी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजपचा धिक्कार असो” अशी घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे मुख्य संघटक राजेंद्र शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पटेल, डॉ.स्मिता शहापुरकर, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिलाताई उंबरे, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रोहित पडवळ, ओबीसी विभागाचे अध्यक्ष धनंजय राऊत, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, दर्शन कोळगे, सेवादल जिल्हाध्यक्ष विलास शाळू, सचिव सुरेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य अश्रूबा माळी, बाबा घुटे, विश्वजित शिंदे, प्रभाकर लोंढे, प्रभाकर डोंबाळे, स्वप्नील शिंगाडे, अशोक बनसोडे, सुनील बडूरकर, अभिमान पेठे, सौरभ गायकवाड, महादेव पेठे, अहमद चाऊस, अंकुश पेठे, संजय गजधने, जमीर सय्यद, संतोष पेठे, मेहराज शेख, अभिजित देडे, आकाश कदम, प्रवीण कांबळे, आर्यन गायकवाड, दीपक कदम, प्रथमेश ढेंगळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 
Top